हवाई दलात 200 फायटर जेटस्

342
air-force

हिंदुस्थानच्या हवाईदलात लढाऊ विमानांची कमतरता भासू नये, यासाठी केंद्र सरकार लवकरच 200 फायटर जेट विमाने खरेदी करणार असल्याची माहिती संरक्षण सचिव अजय कुमार यांनी कोलकाता येथे दिली. हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेडकडून तयार करण्यात येत असलेल्या 83 ‘एससीए तेजस मार्क-1’ लढाऊ विमानांचे कंत्राट शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अजय कुमार यावेळी म्हणाले, 83 लढाऊ विमानांशिवाय 110 अन्य विमानांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण 200 लढाऊ किमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या