दोन हजारांची नोट चलनात कायम राहणार

349
2000-note

दोन हजारांची नोट चलनातून हद्दपार होणार असल्याच्या वृत्ताचे मंगळवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी खंडन केले. काळजी करू नका, दोन हजार रुपयांची नोट चलनात कायम राहणार आहे, असे स्पष्टीकरण ठाकूर यांनी राज्यसभेत उपस्थित झालेल्या एका प्रश्नावर दिले. समाजवादी पार्टीचे खासदार विश्वंभर प्रसाद निशाद यांनी दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची सरकारची योजना आहे का, अशी विचारणा राज्यसभेत केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या