
कल्याणमधील एका 20 वर्षीय तरुणाचा धावत्या लोकल मध्ये स्टंट करताना मृत्यू झाला आहे. दिवा मुंब्रा दरम्यान हा अपघात झाला आहे. मृत तरुणाचे नाव दिलशान नौशाद खान असे आहे..
दिलशान आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गोवंडीला कपडे विकत घ्यायला गेला होता. तेव्हा परतताना लोकल रिकाम्या होत्या. लोकलमध्ये प्रवास करताना दिलशाद दरवाज्याला लटकून स्टंट करत होता. त्याचा मित्र या स्टंटचा व्हिडीओही काढत होता. तेव्हा दिवा मुंब्रा दरम्यान एका खांबाला दिलशाद धडकला आणि खाली कोसळला. दिलशादला तत्काळ जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिथेच दिलशादला मृत घोषित केले.


























































