
मध्य प्रदेशमध्ये ऑक्सिजन अभावी 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्व रुग्ण आयसीयुमध्ये दाखल होते. शनिवारी रात्री 12 वाजता ऑक्सिजनचा साठा संपला आणि रुग्णालयात एकच धावपळ उडाली. आणि ऑक्सिजन अभावी 12 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील ही पहिलीच घटना नाही यापूर्वी 12 रुग्णांचा असाच ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशच्या शहाडोलमधील हे दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण देशात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा आहे. शहाडोलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सिजन नसल्याने नसल्याने अनेक रुग्णांनी स्वतःच ऑक्सिजन मास्क हाताने दाबून ऑक्सिजन घ्यावा लागला. शनिवारी रात्री 12 च्या सुमारास ऑक्सिजन संपला आणि 12 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच यापूर्वी 1५ एप्रिल रोजी जबलपूरच्या लिक्विट प्लांटमध्ये काही अडचणी आल्या आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर 4 रुग्णांचा प्रकृती ढासळली. तसेच ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने सुख सागर मेडिकल रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाला.




























































