आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात ‘गजब तिची अदा’

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित ‘23 व्या इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात भारंगम म्हणजेच भारत रंग महोत्सवात, प्रा. वामन पेंद्रे लिखित, दिग्दर्शित व संगीतबद्ध केलेले मराठी नाटक, ‘गजब तिची अदा’ या नाटकाची निवड झाली आहे.

1 फेब्रुवारीपासून दिल्ली येथे होणाऱया या आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवात मराठी भाषेतील गाजलेल्या, आगळय़ावेगळय़ा वैश्विक विषयावरच्या, अनोख्या शैलीत सादर झालेल्या ‘गजब तिची अदा’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या नाटकात प्रा. वामन पेंद्रे संचलित व रंगपीठ आयोजित कार्यशाळेतून प्रशिक्षित झालेले दोन डझन अत्यंत गुणी कलाकार – ऋत्विक पेंद्रे, करिश्मा देसले, श्रुती हळदणकर, तेजस्विनी कुराडे, वैष्णवी घोडके, मोहिका गद्रे, अंकिता देसाई, सांप्रती पाटील, श्वेतनील सावंत, तन्वी धुरी, संस्कृती जाधव, समृद्धी देसाई, मंदार पंडित, सचिन जाधव, अमोल जाधव, मंगेश शिंदे, सुमित भालेराव, अनुप हरिश्चंद्रे, दर्शन रायकर, रोहित कुलकर्णी, मनीष जाधव, महेश महालकर, विभव साळवे अभिनय करत आहेत. नाटकाची निर्मिती अनामिका व रंगपीठ मुंबई या संस्थेची असून साईसाक्षी या संस्थेने हे नाटक सादर केले आहे.