
पाकव्याप्त कश्मीरातील लाँचिंग पॅडवरून जवळपास 250 दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणेने याबाबत सुरक्षा यंत्रणांना अॅलर्ट जारी केला असून नियंत्रण रेषेवर (एलओसी) लष्करानेही अतिदक्षता बाळगली आहे. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळण्यासाठी लष्कर सतर्क झाले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शस्त्रसंधी करार करण्यात आला. हा करार झाल्यानंतरही हिंदुस्थानविरोधात पाकिस्तान सातत्याने कुरापती करीत आहे. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी उत्तर कश्मीरच्या एलओसीवर नऊ लॉन्चिंग पॅड तयार केले आहेत. तसेच बालाकोट, गढी हबीबुल्ला, चेलाबांडी, शावनाला, दुलेई, सनसा, कोटलीर, गुलपूर, फगोश, डुबली या भागांत दहशतवाद्यांचे नवीन ट्रेनिंग पॅम्पदेखील सुरू करण्यात आले आहेत.
























































