टेन्शन वाढले, अयोध्येत कोरोनाचे रुग्ण दुप्पट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढू लागली आहे. राममंदिराच्या सुरक्षेसाठी असलेल्या 14 पोलिसांना कोरोना झाल्याचे समोर आले असतानाच मागील 12 दिवसांत अयोध्येतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने मंदिर ट्रस्टमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अयोध्येत 29 जुलैपर्यंत 993 कोरोना रुग्ण होते. या रुग्णांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला असून 605 रुग्ण बरे झाले आहेत. एका आठवड्यापूर्वी तेथे 703 कोरोना रुग्ण होते. त्यापैकी 483 रुग्ण बरे झाले. सात दिवसांत अयोध्या जिल्ह्यात 290 कोरोना रुग्णांची भर पडली. यादरम्यान 122 लोकांना घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे अयोध्येतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली. गेल्या आठवड्यात अयोध्येचा रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्के इतका होता. त्यात घट होत या आठवड्यात तो 68 टक्क्यांवर घसरला आहे.