मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना गाडीत बसून राहिलेल्या ३ पोलिसांचे निलंबन

6


सामना ऑनलाईन । अहमदाबाद
मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला उभं राहण्याऐवजी गाडीत बसून राहील्याने ३ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा ताफा गांधीनगरमधल्या इंदरोडा सर्कलवरून जात होता. जयंतीभाई परमार, महेंद्रसिंह जसवंतसिंह आणि जयमल मालाभाई हे तिघेजण पोलिसांच्या गाडीतच बसून राहिले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे पोलीस अधीक्षक विजय पटेल यांनी या तिघांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या