तीन किलोचा बर्गर 4 मिनिटांत फस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूक लागली की लोक कोणताही विचार न करता दाबून खातात. खाण्याच्या अशा हटके स्पर्धाही घेतल्या जातात. काही जण खाण्यासोबत काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. अशाच एकाने तीन किलोचा बर्गर अवघ्या चार मिनिटांत फस्त केलाय! जर एवढय़ा कमी वेळेत भलामोठा पदार्थ जर पुणी खात असेल तर चर्चा तर होणारच ना.

मॅट असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने बेगलचे 40 स्लाईस, 8 पॅटी आणि पनीरचे 16 स्लाईसने तयार केलेला 20 हजार कॅलरींचा बर्गर सहजपणे खाल्ला आहे. मॅटने बर्गर खात असतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मॅटने 26 जुलै रोजी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी ज्या व्यक्तीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे, त्याने बर्गर खाण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ घेतला होता.