लंडनमधील रेल्वे स्थानकाजवळ 3 जणांना भरदिवसा भोसकले, तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
london

मध्य लंडनमधील लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनजवळ गुरुवारी दिवसाढवळ्या तीन जणांवर चाकूने वार करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की अद्याप प्राथमिक तपास सुरू आहे. त्यामुळे आता कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येत नाही. पण याकडे दहशतवादाशी संबंधित घटना म्हणून पाहता येत नाही.

लंडन शहर पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, तीन जणांना भोसकण्यात आले आणि एका व्यक्तीला जमिनीवर ढकलण्यात आले.

‘आम्हाला सकाळी 9.46 वाजता तीन जणांना भोसकल्याचे आणि एका व्यक्तीला जमिनीवर ढकलले गेल्याचे वृत्त मिळाले आणि अधिकारी सकाळी 9.51 वाजता घटनास्थळी पोहोचले. तीन पीडितांना एलएएसने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. तपास सुरू आहे, परंतु ही घटना दहशतवादाशी संबंधित असल्याचं आता तरी सांगता येत नाही’, असे पोलिसांनी सांगितले.

लंडन शहर पोलिसांनी देखील सांगितले की ते या घटनेला संशयित हल्ला मानत आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टेलिग्राफ यूकेच्या मते ही चोरीची घटना होती. एका दुचाकीवरून आलेल्या चोराने एका व्यक्तीचा फोन लुटण्याचा प्रयत्न केला आणि पीडित व्यक्तीने प्रतिकार केल्यानंतर हल्ला करण्यात आला. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.