कोल्हापुरात 31 जण कोरोना संशयित रुग्ण

488

कोल्हापूर जिल्ह्यात आज आणखी 31 संशयित करोनासदृश्य रुग्ण आढळले. तर 9 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन, एकुण 44 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजुन 23 संशयितांचे अहवाल मिळालेले नाहीत.

दरम्यान गेल्या चोवीस तासांत परदेशातुन जिल्ह्यात आणखी 7 जण आल्याचे निष्पन्न झाले. तर मुंबई,पुणे आदि शहरातुन आतापर्यंत 64 हजार 545 जण आल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. सध्या जिल्ह्यात 2 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 1 रुग्ण संदिग्ध आहे.

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांत जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार परदेशातुन आणखी 7 जण आल्याने आतापर्यंत परदेशातुन जिल्ह्यात आलेल्या प्रवाशांची संख्या 819 झाली आहे. यामधील 382 जणांची 14 दिवसांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. यातील 437 जण घरी देखरेखी खाली आहेत. तर देशात मुंबई, पुणे सह करोनाबाधीत शहरातुन गेल्या चोवीस तासांतच एकही जण आला नसल्याचे चित्र असुन आतापर्यंत 64 हजार 545 एवढीच संख्या आहे.

यापैकी 5 हजार 634 जणांचा 14 दिवसांचा वैद्यकीय पाठपुरावा पुर्ण झाला असुन, रविवारी 634 जणांचा पाठपुरावा पुर्ण झाला आहे. तर 58 हजार 871 जणांना विलगीकरण करण्यात आले आहे. संशयित रुग्णांमध्ये आज आणखी 31 जणांची भर पडली आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा आकडा 5०6 झाला आहे. चोविस तासांत आणखी 9 जणांचे असे आतापर्यंत एकूण 181 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील 137 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असुन 23 अहवाल अप्राप्त आणि आज 4 जणांचे असे आतापर्यंत एकूण 14 जणांचे अहवाल फेटाळण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या