Video – दुहेरी स्फोटाने हादरली इराकची राजधानी, 32 लोकांचा मृत्यू

file photo

इराकची राजधानी बगदादमध्ये दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटात तब्बल 32 लोकांचा मृत्यू झाला असून 110 जण जखमी झाले आहेत. नव्या वर्षातला हा पहिला दहशवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे.

या हल्ल्याची कुठल्याही संघटनेने अजून कोणीही जवाबदारी घेतलेली नाही. 2017 साली इस्लामिक स्टेटला हरवल्यानंतर इराकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण कमी झाले होते. 2018 साली जानेवारी महिन्यात अखेरचा दहशतवादी हल्ला झाला होता.


इराकी सैन्याने दिलेल्या माहितीनुसार दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी बगदादच्या तायरन चौकात गर्दीच्या भागात स्फोट केला. यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले असून अनेक जखमी झाले आहेत.

या स्फोटात आतापर्यंत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 110 जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या