शाळांमधील माध्यान्ह भोजन योजनेत 364 कोटींचा घोटाळा

प्रातिनिधिक फोटो

मुंबई महानगरपालिका शाळांमधील माध्यान्ह भोजन योजनेत 364 कोटींचा घोटाळा झाल्याचे विरोधी पक्षाने आज विधान परिषदेत निदर्शनास आणले. यामध्ये 20 संस्थांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राटे देऊन शासनाची फसवणूक केली असून या संस्थांवर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवले जाते.