कल्पना एक आविष्कार अनेक… ‘हिलाऱ्या’ आणि ‘अन्नपूर्णा हाजिर हो’ने मारली बाजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

36 व्या  ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या एकांकिका स्पर्धेत  प्रवेश मुंबईची ‘हिलाऱ्या’ आणि रंगवेद मुंबईची ‘अन्नपूर्णा हाज़िर हो’ या दोन एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत, तर निशिगंध क्रिएशन्सची ‘शे.उ.वा’ उपविजेती एकांकिका ठरली.

‘अस्तित्व’ आणि ‘चार मित्र’ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा आयोजित करण्यात आली.  दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी ‘भूक’ हा विषय यंदा सादरीकरणासाठी सुचवला होता. 15 एकांकिका प्राथमिक फेरीत सादर झाल्या. अंतिम फेरीचे परीक्षण प्रख्यात लेखक ऋषीकेश कोळी, अभिनेत्री मृणाल चेंबूरकर आणि ज्येष्ठ कवी नीलपंठ कदम यांनी केले. सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक विभागून भाग्यश्री पाणे आणि मकरंद देशपांडे यांना ‘हिलाऱ्या’ आणि ‘अन्नपूर्णा हाज़िर हो’ या एकांकिकांसाठी देण्यात आले.