नगर जिल्ह्यात गुन्हेगारांच्या 387 टोळ्या; पोलिसांनी केले कायदेशीर कारवाईचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाळू तस्करीसह चोऱ्या, घरफोड्या, दरोडे असे संघटित गुन्हे करणाऱ्या तब्बल 387 टोळ्या नगर जिल्ह्यात असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या टोळ्यांनी वर्तन सुधारले नाही तर या टोळ्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा असा इशारा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी दिला. नगर जिल्ह्यामधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टु प्लस योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. त्याची महिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते.

नगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपींवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी पोलीस अधिक्षक पाटील यांच्या संकल्पनेतून नगर जिल्ह्यात जानेवरी 2021 पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली. या योजनेसाठी नगर जिल्हयामध्ये मालाविषयक, शरीरविषयक तसेच वाळुविषयक असे प्रकारचे गुन्हे करणारे व ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा सराईत गुन्हेगारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.

या योजनेची नगर जिल्हयामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधित टु प्लस योजनेसाठी लागणारी माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी पोलीस अधिक्षक पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखा, नगर येथे एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अंमलदार यांची टु प्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची 2011 पासूनची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची 2015 पासून माहीती संकलित करण्यात आली. संकलित केलेली माहीती टु प्लस पथकांमार्फत टु प्लस योजनेच्या बेबसाईटवर भरण्यात आली आहे.

नगर जिल्हयामध्ये जानेवरी 2021 पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस 3841 ( मालाविषयक 1914, शरीरविषयक 1927) आरोपींचा टु प्लस योजनेमध्ये समावेश करुन त्यांची संकलित केलेली माहीती टु प्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती. तसेच जानेवारी 2021 पासून दैनंदिन अटक केलेल्या आरोपींमधून नव्याने 437 (मालविषयक 214, शरीरविषयक 223) आरोपी आढळले असून तापर्यंत 4278 आरोपींची नोंद वेबसाईटवर करण्यात आली आहे.

आरोपींचे मेळावे

नगर जिल्ह्यामध्ये जानेवरी 2021 पासुन टु प्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस 4278 आरोपींचा टु प्लस योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून अशा आरोपीचे गुन्ह्यांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी, यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नगर जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना आरोपींचे मेळावे घेण्यात आले. यापुढे गुन्ह्यामध्ये सहभाग आढळल्यास अन्य कायदेशीर कारवाईची जाणीव करून देण्यात आली.

नवे हिस्ट्रीशीट केले तयार
टु प्लस योजनेमध्ये सामाविष्ठ असलेले मालाविषयक गुन्हे करणारे यातील प्रोफेशनल / सराईत व्यवसायिक गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी जिल्हयातील 451 सराईत गुन्हेगारांचे नवीन हिस्ट्रीशीट उघडण्यात आले आहे. जिल्हा अभिलेखावरील जुने 167 हिस्ट्रीशिटर्स पैकी अक्रियाशिल 82 हिस्ट्रोशिटस कमी करण्यात आले असून आतापर्यंत नवीन व जुने असे एकुण 451+85 = 536 हिस्ट्रीशीट नगर जिल्हा अभिलेखावर क्रियाशिल आहेत.

गुंडा रजिस्टर तयार
टु प्लस योजनेमध्ये सामाविष्ट असलेले शरीरविषयक गुन्हे करणारे गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी नवीन 517 गुंडांना गुंडा रजिस्टरमध्ये सामाविष्ठ करण्यात आले असून जिल्हा अभिलेखावर जुन्या 901 गुंडापैकी अक्रियाशिल असे 209 गुंड गुंडा रजिस्टरमधुन कमी करण्यात आले असून आतापर्यंत नवीन व जुने असे एकूण 517 + 692 मिळून 1209 गुंड नगर पोलिसांच्या अभिलेखावर आहेत.

  • प्रतिबंधक कारवाई
    नगर जिल्हा अभिलेखावरील टु प्लस योजनेत सामाविष्ठ आरोपीविरुद्ध सीआरपीसी 110/107 नुसार 1422 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
  • टू प्लस योजनेतील शरिराचे गुन्हेगारांतुन 142 टोळया निष्पन्न करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार ऑक्टोबर 2020 पासून आतापर्यंत 13 प्रस्ताव प्राप्त झाले असून 4 क्रियाशिल गुन्हेगारी टोळींना हद्दपार करण्यात आले आहे

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 नुसार 24 प्रस्ताव कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 57 नुसार 2 प्रस्ताव कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले आहेत.

एमपीडीए नुसार प्रस्ताव प्राप्त असून एका आरोपीला स्थानबद्ध करण्यात आले आहे व 5 प्रस्ताव अंतिम मंजुरीस आहे.

संघटीत गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत 6 प्रस्ताव प्राप्त असून सर्व प्रस्तावास नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे. त्यापैकी अपर पोलीस महासंचालक (का. व. सु., महाराष्ट्र राज्य मुंबई) यांनी ३ प्रस्तावास दोषारोप पत्र पाठविण्याची परवानगी दिलेली आहे.

ही टु प्लस योजना अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे तसेच जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, अनिल कटके व टु प्लस पथकातील पोलीस अंमलदार यांनी राबवालेली आहे.