टिटवाळा, वाड्यात चौघांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

सामना प्रतिनिधी । टिटवाळा/ वाडा

जिह्यात कोसळणाऱ्या धुवाधार पावसातील वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी टिटवाळा येथे दोन विद्यार्थ्यांचा बुडून तर वाडय़ात खेकडे पकडायला गेलेला तरुण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान काशिमीरा येथील चेन्ना नदीत दारू पार्टीनंतर पोहण्यासाठी गेलेला दहिसर पूर्व येथील भारवाड चाळीत राहणारा राहुल राजभर (24) हा तरुण बुडाला.

टिटवाळा येथील बल्याणी परिसरात शेतातील माती काढण्यासाठी गेलेले मयंक शर्मा व पियूष ओझा ही 11 वर्षीय मुले खड्डय़ात बुडाली तर वाड्यातील गोऱ्हे गावात राहणारा सागर भोईर (26) हा खेकडे पकडताना नाल्यात वाहून गेला.