इराणचे इस्रायली गुप्तचर संस्थेच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र हल्ले, चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सोमवारी रात्री इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. इराकमधील एर्बिल शहरात असलेल्या कार्यालयावर हल्ले केले. यात चौघांचा मृत्यू झाला. इराणमधील वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या कमांडर्सचा बदला असल्याचे इराणने म्हटले आहे. इस्रायलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या काही दिवसांत इस्रायलने सीरिया आणि लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले होते. त्यात इराकचे ब्रिगेडियर जनरल राजी मुसावी आणि हमासचे उपनेते सालेह अल अरोरी हे मारले गेले. त्याचा बदला म्हणून इराणनेही इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कार्यालयावर क्षेपणास्त्रs डागली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, इराणचा हल्ला कुर्दिस्तानची राजधानी एरबिलपासून सुमारे 40 किलोमीटर उत्तर-पूर्वेला असलेल्या यूएस दूतावासाजवळ झाला. दूतावासातही स्पह्टांचे आवाज ऐकू आले.