मुंबईला झोडपले; आणखी चार दिवस मुसळधार, मुंबईला हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा खरा ठरवत आज पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. तर पुढील दोन दिवस अतिमुसळधार आणि पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसांसाठी खबरदारीचा ऑरेंज अलर्ट तर पुढील दोन दिवसांसाठी सावधगिरीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱयामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत रविवारपासूनच पावसाचा जोर वाढला. आजही तीच स्थिती राहिल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीवर परिणाम झाला. शिवाय रस्ते वाहतूकही मंदावली. सकाळच्या सुमारास पावसाचा जोर असल्याने कामावर जाणाऱया चाकरमान्यांची चांगलीच काsंडी झाली. जोरदार पावसामुळे पाच ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर तीन ठिकाणी घर-भिंत पडणे आणि डोन ठिकाणी शोर्ट सर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. मुंबईत सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्या अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोकण, मराठवाडा, पुणे घाटात अतिमुसळधार

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असताना दक्षिण झारखंड, दक्षिण बंगाल क्षेत्रात वादळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई, दक्षिण कोकणसह रायगड, पुणे घाट, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचे मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी सांगितले.