दिल्लीतील हिंसाचारानंतर 400 शेतकरी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
**EDS: RPT (CORRECTS DETAILS)**New Delhi: Police pin down a farmer, who allegedly attacked Police SHO (Alipur) Pradeep Paliwal, during clashes between people claiming to be local villagers and farmers at the Singhu Border in New Delhi, Friday, Jan. 29, 2021. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI01_29_2021_000199B)

दिल्लीतील ट्रक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर 400हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनीच या शेतकऱयांना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

बेपत्ता झालेल्या शेतकऱयांनी लाल किल्ला तसेच दिल्लीतील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. पोलीस कोणत्याही ठोस कारणांशिवाय शेतकऱयांना अधिक काळ आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही, असा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. वकिलांचे एक पथक बेपत्ता शेतकऱयांचा शोध घेत आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी 11 तरुण तिहार तुरुंगात असल्याचे वृत्त आहे.