परीक्षा घ्यावी की नको! 454 विद्यापीठांच्या बैठकांवर बैठका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायचाच असा निर्णय घेतला असला तरी परीक्षा घ्यावी की नको याबद्दल देशातील 640 विद्यापीठे संभ्रमात आहेत. 454 विद्यापीठांमध्ये यासंदर्भात बैठकांवर बैठका सुरू आहेत तर 177 विद्यापीठांनी अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही. ‘यूजीसी’ने घेतलेल्या आढाव्यातूनच ही माहिती समोर आली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेऊ नये असा बहुतांश राज्यांचा आग्रह आहे. त्यासंदर्भात विद्यापीठांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी यूजीसीने आढावा घेतला. 2019-20 मध्ये स्थापन झालेल्या 27 खाजगी विद्यापीठांमध्ये अद्याप पहिली बॅच अंतिम परीक्षेसाठी पात्र झालेली नाही.