
ओली पार्टी म्हटलं की बिअर ही हमखास असतेच. बिअर शिवाय पार्टी पूर्ण होतच नाही. पण या बिअरसोबत तुम्ही चखणा म्हणून अनेकदा असे काही पदार्थ खाल्ले जातात की त्यामुळे दुसऱ्या दिवशी हमखास त्रास होतोच. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिअर सोबत किंवा बिअर प्यायल्यानंतर तब्बल दोन तास खाणे टाळावे असे पदार्थ सांगणार आहोत.
फ्रेंच फ्राईज किंवा बटाट्याची कापं

बिअरसोबत बरेच जण फ्रेंच फ्राईज खातात. अनेक हॉटेलमध्ये चखण्यासाठी फ्रेंज फ्राईज दिले जातात. मात्र तेलात तळून काढलेले हे फ्रेंच फ्राईज बिअरसोबत खाणे हे आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्याने पचनाशी संबंधित आजार उद्धभवतात.
ब्रेड

बिअर सोबक किंवा बिअर प्यायल्यानंतर किमान दोन तास तरी ब्रेडचे पदार्थ खाऊ नको. त्याने अपचन, अॅसिडीटी होऊ शकते.
मिठाई

काहींना बिअरसोबत घरात असलेली मिठाई खायला आवडते. मिठाई खायचीच असली तर बिअर प्यायल्यानंतर दोन तासाने खा. बिअर व मिठाई हे समीकरण शरीरासाठी हाणीकारक आहे.
शेंगदाणे

अनेक रेस्टॉरंट व बारमध्ये चखणा म्हणून खारे शेंगदाणे दिले जातात. मात्र बिअर सोबत शेंगदाणे खाणे खाल्यास डिहाड्रेशनचा त्रास होतो. त्यामुळे शेंगदाणे टाळावे.
मसालेदार पदार्थ

बिअरोसबत कधीच मसालेदार पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पोटात जळजळ होते.
























































