
रेशनवाल्याकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. विशाल मोरे आणि सना खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्याचे अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. बोरिवली पश्चिमच्या इस्सर कॉलनी येथे एक रेशनचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी नीलेश आणि सना हे दोघे रेशनच्या दुकानात आले. दुकानात काळाबाजार सुरू आहे. जर 40 लाख रुपये न दिल्यास पोलिसांना सांगून गुन्हा दाखल करून अटक करू अशी भीती घातली. तडजोड करून पाच लाख रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराने याची माहिती एमएचबी पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकाने कारवाई करीत त्यांना अटक केली.



























































