50 मेगापिक्सल कॅमेरा, 6 GB RAM; Samsung Galaxy A33 5G लवकरच होणार लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

6 GB RAM आणि 50 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Samsung Galaxy A33 5G हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे. तसेच फोनच्या बॅटरीची क्षमता 5000mAh इतकी असणार आहे.

Samsung Galaxy A33 5G चे फीचर

Samsung Galaxy A33 मध्ये 5G असणार आहे.  Samsung Galaxy A33 फोनमध्ये बॅटरीची क्षमता 5000mAh इतकी आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर असणार आहे. फोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉईड सिस्टम 11 असणार आहे. तसेच 128 GB इंटर्नल मेमरी असणार आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. या फोनची किंमत अजून कळालेली नाही जानेवारी 2022 मध्ये हा फोन हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे.