कसबा, चिंचवडमध्ये 50 टक्के मतदान; 2 मार्चला निकाल, कसब्यात भाजपचे पैसे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसबा विधानसभेत भवानीपेठ, गंजपेठ या भागातील मतदान केंद्रावर संध्याकाळी सव्वासात वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आरोप, व्हायरल झालेले व्हिडीओ, पोलिसांमध्ये दाखल झालेले गुन्हे, त्याचबरोबर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी कमळ चिन्ह असलेला भाजपचा स्कार्फ गळय़ात घालून मतदान केल्याने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमुळे मतदानाला गालबोट लागले.

चिंचवडमध्ये 18 केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा  

चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली असून 28 उमेदवार नशीब अजमावत आहेत.  चिंचवडमध्ये मतदान केंद्रांवर 12 ईव्हीएम मशीन्स बंद पडल्या. त्यामुळे काही काळ मतदारराजाची गैरसोय झाली, मात्र जलद कृती दलाने याची तत्काळ दुरुस्ती करून दिलासा दिला. दरम्यान, चिंचवडमध्ये संवेदनशील असलेल्या 18 मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला होता.