जय हनुमान! ऑस्ट्रेलियाने परत केली 500 वर्षं जुनी हनुमानाची मूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडू येथील मंदिरातून चोरलेली हनुमानाची 500 वर्षं जुनी मूर्ती ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला परत दिली आहे. ऑस्ट्रेलिया येथील हिंदुस्थानी दुतावासाकडे ही मूर्ती सोपवण्यात आली आहे.

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सरकार देशातील अनेक मौल्यवान वस्तुंना परत आणण्यासाठी काम करत आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत. आतापर्यंत 251 पुराणवस्तू वेगवेगळ्या देशांतून परत आणल्या गेल्या आहेत.

त्यांनी या मूर्तीविषयीही माहिती दिली आहे. ही मूर्ती चोल काळातील 14व्या-15व्या शतकात विष्णु मंदिरातून चोरी झालेली हनुमानाची मूर्ती आहे. ती मूर्ती ऑस्ट्रेलियाकडून परत आणण्यात येणार आहे. ही मूर्ती 9 एप्रिल 2012 रोजी अरियालुर जिल्ह्यातील वेल्लुर गावातील वरदराजा पेरुमल मंदिरातून श्री देवी आणि भू देवीच्या मूर्तीसह ही मूर्ती देखील चोरी झाली होती. ही मूर्ती न्यूयॉर्क येथे पोहोचली. तेथील घराचा लिलाव झाल्यानंतर ती मूर्ती ऑस्ट्रेलियाला गेली. पण, ते घर विकत घेणाऱ्यांना ती मूर्ती चोरीची असल्याबद्दल काहीही कल्पना नव्हती, अशी माहिती मिळत आहे.