देशात आढळले कोरोनाचे 52 हजार रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 19 लाखांच्या वर

547

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 52 हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाखांच्यावर गेली आहे. गेल्या 24 तासात 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 12 लाखहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

योग्य प्रमाणात तामसीक आहार घेतल्यास होतो कोरोनापासून बचाव  

गेल्या 24 तासात 52 हजार रुग्ण सापडले आहेत. तर 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 8 हजार वर पोहोचली आहे. आतापर्यंत 39 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 86 हजार इतकी आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 897 इतकी झाली आहे.

हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट येणार का?…या आहेत शक्यता… 

देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.3 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासात 44 हजार 306 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासात 6 लाख 61 हजार 892 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

सन फार्माने बनवली कोरोनामुक्तीची स्वस्त गोळी 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 4 लाख 41 हजार 228 रुग्ण सापडले असून 15 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूत 2 लाख 57 हजार 613 रुग्ण सापडले असून 4 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या