
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. काल रात्री उशिरा खेरागड येथे कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टेम्पोमधील 6 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा खेरागड पोलीस स्टेशन हद्दीतील जिओ पेट्रोल पंपाजवळ घडली. टेम्पोमध्ये बसलेले सुमारे 9 लोक सैया भागातून खेरागड गावाकडे जात असताना जिओ पेट्रोल पंपाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एक्सयूव्ही 300 कारने त्यांना धडक दिली.
या अपघातात 5 पुरुष आणि एका 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली असून, ग्रामस्थांनी रस्त्यावर रास्ता रोको केला. या अपघातातील कार चालकाने गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.




























































