इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये झळकणार 6 मराठी सिनेमे

हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इफ्फीचे यंदा 50 वे वर्षे आहे. यंदाच्या इफ्फीमधील इंडियन पॅनोरमात 5 मराठी चित्रपटांना स्थान मिळाले आहे. मात्र, एकाही कोकणी सिनेमाची निवड पॅनोरमामध्ये झाली नसल्याने गोव्यात चित्रपट रसिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. इंडियन पॅनोरमामधील फिचर फिल्म विभागात दाखवण्यासाठी निवडलेल्या 26 फीचर फिल्ममध्ये 5 मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे.

इंडियन पॅनोरमाच्या फीचर फिल्म विभागात सुजय सुनील दहाके दिग्दर्शित तुझ्या आयला, समीर संजय विध्वंस दिग्दर्शित आनंदी गोपाळ, शिवजी लोटन पाटील दिग्दर्शित भोंगा, अनंत नारायण महदेवन दिग्दर्शित माई घाट: क्राइम नंबर 103/2005 तसेच आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित फोटो प्रेम या सिनेमांचा समावेश आहे. तसेच नॉन फिचर फिल्म विभागात 15 पैकी गणेश शिवजी शेलार दिग्दर्शित गढूळ या एकाच सिनेमाचा समावेश आहे. गोव्यात इफ्फी आयोजित होत असूनही एकाही कोकणी सिनेमाची निवड इंडियन पॅनोरमामध्ये झाली नसल्याने कोकणी चित्रपट निर्मात्यांनी आणि चित्रपट रसिकांना नाराजी  व्यक्त कली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून कोकणी चित्रपट निर्मात्यांवरील अन्याय दूर केला नाही तर इफ्फी दरम्यान आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या