अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 6 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॅपटॉप, कॉम्प्युटर दुरुस्तीच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ब्रॅल्डन किफ फर्नांडिस, आकाश शरद खैरे, जेमन जोम्स मॅथ्यू, जेम्सजॉन अलेकाsंडर, शुभम हरिशेष सिंग, सॅमगई स्टिफन थॉमस यांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधाराच्या अटकेसाठी वनराई पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.