
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर आणखी सहा विशेष ट्रेन चालविणार आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-पनवेल-पुणे आणि सावंतवाडी रोड या मार्गावर या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.
ट्रेन क्र. 01221 – पुणे-सावंतवाडी रोड-एलटीटी ही स्पेशल ट्रेन 29 ऑगस्ट रोजी पुण्यावरून रात्री 12.10 वाजता सुटणार असून पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोडला पोहचणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्र. 01222 ही 30 ऑगस्ट रोजी सावंतवाडी रोड स्थानकातून पहाटे 5.20 वाजता सुटणार असून एलटीटीला दुपारी 4.50 वाजता पोहचणार आहे.
ट्रेन क्र. 01223 – एलटीटी-सावंतवाडी रोड-पनवेल ही स्पेशल ट्रेन 30 ऑगस्टला एलटीटीहून सायंकाळी 5.50 वाजता सुटणार असून सकाळी 6.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहचणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्र. 01224 सावंतवाडी रोड स्थानकातून 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10.55 वाजता सुटणार असून पनवेलला रात्री 11.40 वाजता पोहचणार आहे.
ट्रेन क्र. 01225 – पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे ही ट्रेन 31 ऑगस्टला पनवेलहून मध्यरात्री 12.55 वाजता सुटणार असून दुपारी 2.10 वाजता सावंतवाडी रोडला पोहचणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्र. 01226 सावंतवाडी रोड स्थानकातून 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वाजता सुटणार असून पुणे स्थानकात सकाळी 7.25 वाजता पोहचणार आहे.


























































