चीनमध्ये 36 दिवसांत कोरोनाचे 60 हजार बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनने पहिल्यांदाच आपल्या देशात कोरोनाने हाहाकार माजविल्याचे सत्य जगापुढे मांडले आहे. 8 डिसेंबर ते 12 जानेवारी 2023 या अवघ्या 36 दिवसांत चीनमध्ये कोरोनामुळे तब्बल 60 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा उगमच चीनमध्ये 2019 मध्ये झाला, तेव्हा चीनने ही माहिती जगापासून लपविली होती. चीनमुळे जगभरात कोरोना पसरला आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दोन-तीन लाटा येऊन गेल्या. जगातील व्यवहार बऱयाच प्रमाणात सुरू झाले; मात्र चीनमध्ये कोरोना संपलेलाच नाही. झीरो कोविड पॉलिसीचा अतिरेक केल्यामुळे बीजिंगसह अनेक शहरांमध्ये कोरोनाने कहर माजविला आहे.