स्वप्नांचा नक्षीदार प्रवासस्वप्नांचा नक्षीदार प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022’ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीच्या सामान्य स्वप्नांचा प्रवास असणाऱया या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमियर सिंगापूर  येथे झाला असून 2 डिसेंबर रोजी हा चित्रपट  प्रदर्शित होणार आहे.

पोस्टरमध्ये सायली संजीव, सुव्रत जोशी आणि आरव शेटये दिसत असून त्यांचं हसतंखेळतं कुटुंब दिसत आहे. छोटय़ा गावातील या गृहिणीचा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास तिला कुठवर घेऊन जातो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे असून चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पीयूष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे.