
गणेशोत्सवाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. मोठय़ा मंडळाच्या बाप्पांच्या आगमानाला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने तब्बल 75 हजार मातीच्या पणत्यांपासून विघ्नहर्ता गणरायाचे भव्यदिव्य पोर्टेट साकारले आहे. 50 फूट लांब आणि 40 फूट रुंद आकाराचे पोर्ट्रेट साकारण्यासाठी 6 रंगांच्या छटा असलेले दिवे वापरले आहेत. चेतन यांनी आपल्या 12 सहकाऱयांच्या मदतीने दोन दिवसांत पोर्टेट साकारले आहे. हे पोर्टेट कलारसिकांना 20 ऑगस्टपर्यंत पवईच्या सिनेमा ग्राउंड येथे पाहायला मिळणार आहे.





























































