चंद्रपुरात पिसाळलेल्या वानरांचा हैदोस, 8 जणांना घेतला चावा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात वानरांनी उच्छाद मांडला आहे. या परिसरात पिसाळलेल्या 2 माकडांनी 7 ते 8 नागरिकांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतला आहे. वानरांच्या उच्छादामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाबूपेठ परिसरातल्या सिटी शाळा भागात वानरांनी नागरिकांना लक्ष्य करून या वानरांनी झाडावर तळ ठोकला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वानरांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या