धक्कादायक! 80 वर्षाच्या वृद्धाचा अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार

36
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । गुवाहटी

आसाममध्ये एका 80 वर्षाच्या नराधम वृद्धाने 12 वर्षाच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केला आहे. अनिल सैकीया असे त्या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यातील सेकीया गावात हा प्रकार घडला आहे.

पीडित मुलीचे आई वडिल कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना अनिल तिच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने चॉकलेट देऊन मुलीला भुलवले व तिच्यावर बलात्कार केला. मात्र मुलीच्या ओरडण्याने आजुबाजुचे लोक जमा झाले व त्यांनी अनिलला रंगेहाथ पकडले. त्यानंतर लोकांनी अनिलला मारहाण केली व पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले असून घडलेल्या प्रकाराचा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या