
कारच्या इंजिनमध्ये अडकलेल्या तब्बल 9 फूट लांब अजगराला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आल. चंद्रपूर शहरातील ही घटना असून वडगाव येथे राहणारे अनुप माथनकर व अविनाश रोडे हे शेतावरून काल रात्री घरी परत येत होते. परत येत असतांना ऊर्जानगर जवळ एक अजगर त्यांच्या गाडी पुढे आला त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. अजगर निघून जायची त्यांनी वाट पाहिली मात्र हा अजगर रस्ता ओलांडून पुढे जाण्याऐवजी होंडा सिटी कारच्या इंजिनमध्ये शिरला. त्या नंतर सर्पमित्रांना बोलावण्यात आले मात्र अनेक प्रयत्न करून देखील अजगर बाहेर निघाला नाही. शेवटी ही कार टो करून एका कार वॉशिंग सेंटर मध्ये नेण्यात आली आणि शेवटी मोठ्या प्रयत्यांनी हा अजगर बाहेर काढण्यात आला. हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या मदतीने या अजगराला जंगलात निसर्गमुक्त केले आहे.


































































