हिंदुस्थानचेच 9 सैनिक मारले, पाकड्यांचा कांगावा

1517

हिंदुस्थानी सैन्याने पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. त्यात पाकिस्तानचे पाच सैनिक मारले गेले. परंतु या कारवाईत हिंदुस्थानचे दोन बंकर उडवले असून 9 सैनिक मारल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. तसेच त्यांचा एक सैनिक आणि काही नागरिक मृत्यू पावल्याची कबुलीही त्यांनी दिली.

पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते हसन गफूर यांनी ट्विटरवर दावा केला आहे की हिंदुस्थानी माध्यमांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या आहेत.

गफूर म्हणाले की, हिंदुस्थानी सैन्याने जुरा, शाहकोट आणि नौसेहरी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यात पाकिस्तानाचा एक सैनिक आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या कारवाईत हिंदुस्थानचे दोन बंकरही उध्वस्त केले आहेत. तसेच 9 सैनिक मारले गेल्याचा दावा गफूर यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या