
मुंबईत पालिका आणि शासकीय प्रकल्पांच्या कामात असणाऱ्या 2737 झाडांपैकी तब्बल 90 टक्के झाडे शिवसेनेच्या वृक्ष प्राधिकरणातील ठाम भूमिकेमुळे वाचणार आहेत. यातील ७३४ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असून तुटणाNया २५३ झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्यात येणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज ही माहिती दिली.
मुंबईत होणाऱ्या कोणत्याही विकासकामांमध्ये झाडे तोडावी लागत असल्यास पालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागते. यासाठी प्रशासनाकडून वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा लागतो. या ठिकाणी मंजुरी मिळाल्यानंतरच झाडे कापणे िंकवा पुनर्रोपण केले जाते. दरम्यान, नवीन प्रस्तावांनुसार मुंबईत रस्ता-नाला रुंदीकरण, नवीन इमारत-रस्ता, मेट्रो अशा पालिका आणि शासकीय विविध कामांमध्ये एकूण 2737 झाडांना फटका बसणार होता. मात्र यातील 90 टक्क्यांहून जास्त झाडे वाचवून विकासकामे करण्यात येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत एकूण विविध कामांचे एकूण 9 प्रस्ताव मांडले जाणार आहेत. यामध्ये 987 झाडे प्रत्यक्ष कामात असल्याने हटवावीच लागणार आहेत. मात्र यामध्येही जास्तीत जास्त झाडे वाचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ठाम भूमिका घेण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे 734 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या झाडांचे पुनर्रोपण केल्यानंतर त्यांची निगा राखण्यासाठी पालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणांवर विशेष नजर ठेवण्याची गरज असल्याचे जाधव म्हणाले. तर तोडण्यात येणाNया 253 झाडांच्या बदल्यात तिप्पट झाडे लावण्यात येणार आहेत. मुंबईतील झाडे वाचवण्यासाठी शिवसेनेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही हीच भूमिका राहणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
विकासकामे मार्गी लागणार
पालिका प्रशासनाने मांडलेल्या नऊ प्रस्तावांत पर्जन्य जलवाहिन्यांचे काम, भायखळा येथील दहशतवादविरोधी पथक इमारत बांधकाम, मेट्रो स्टेशन बांधकाम, घाटकोपर येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, निवासी इमारत अशा कामांसाठी झाडे हटवावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही कामे करताना जास्तीत जास्त झाडे वाचवण्यात आली आहेत. त्यामुळे 734 झाडांचे पुनर्रोपण आणि 253 झाडे कापण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास ही विकासकामे मार्गी लागणार आहेत.































































