
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
2017 या वर्षात रस्ते अपघात एकूण 9400 मुलांचा मृत्यू झाला आहे. सेव लाईफ फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात सामील झालेल्या 91.4 टक्के लोकांनी ही बाब मान्य केली की बालक रस्ते सुरक्षा हा कायदा अजून मजबूत झाला पाहिजे.
संस्थेच्या अहवालानुसार मुलांच्या अपघाती मृत्यूचे कारण गाडीच सीट बेल्ट न लावणे हे आहे. सीट बेल्ट लावण्यासंदर्भात कायदा आहे परंतु त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. 2017 मध्ये सीट बेल्ट न लावल्यामुळे रस्ते अपघातात 26 हजार 896 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वेक्षणात सामील झालेल्या 26 टक्के मुलांनी मुलांनी म्हटले की त्यांचे आई वडील त्यांना सीट बेल्ट लावण्यास सांगतात. तर 28 टक्के मुलांनी सांगितले की त्यांचे पालक वाहतूक नियम पाळतात.
दिल्ली, मुंबई, जयपूर, कोलकाता, लखनौ आणि बेंगरुळू सारख्या शहरातील 98.2 टक्के लोकांनी कबुल केले की ते वाहन चालवताना सीट बेल्ट लावत नाहीत. सीट बेल्ट बाबत उदासीनता असण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याबाबत असलेली जागरुकता. पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशाची अपघात मरण्याची शक्यता अधिक असते असे सर्वेक्षणात सामील झालेल्या लोकांनी नमूद केले.
























































