नववी ते बारावीपर्यंत 30 टक्के अभ्यासक्रम कमी, पहिली ते आठवीपर्यंतचे अधिकार शाळांना

1154

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी (2020-21) अभ्यासक्रम कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात करण्याचे अधिकार शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

अभ्यासक्रम कमी करण्यासाठी ‘सीबीएसई’ आणि ‘एनसीईआरटी’ची एक विशेष समिती गठित करण्यात आली होती. समितीने दिलेल्या शिफारशीनुसार हा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.देशभरातील एकूण 22 राज्यांमध्ये हा अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. शाळेच्या कोणत्याही अंतर्गत परीक्षेत किंवा बोर्डाच्या मुख्य परीक्षेत कमी केलेल्या अभ्यासक्रमाकर प्रश्न विचारण्यात येणार नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या