पन्नास वर्षीय व्यक्ती नाल्यात वाहून गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

सामना प्रतिनिधी। सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यात पावसाने धूमाकूळ घातला असून रस्ते नाले पाण्याखाली गेली आहेत. अशाच एका नाल्यात रविवारी एक पन्नास वर्षीय इसम वाहून गेला आहे. सुभाष शिरोडकर (५०) असे त्याचे नाव आहे. तळवडे (भुताची वाडी) येथे सुभाष राहतो. सुभाषचा उशिरापर्यंत शोध घेण्यात आला पण तो अद्याप सापडला नाही.

सिंधुदुर्गात पावसाने धूमाकूळ घातला आहे. संततधार पावसामुळे रस्ते व घरे पाण्याखाली गेली आहेत. नाले व ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे. एवढ्या पावसात सुभाष कामानिमित्त घराबाहेर पडला. पण रस्तेच दिसत नसल्याने तो थेट नाल्यात पडला व वाहून गेला.