
प्रसाद नायगावकर । यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्कॉर्पियोला भीषण अपघात झाला असून त्यात दोन महिला आणि एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर वणी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत खाडे (२४), शशिकला कुबडे (४८) व प्रेमिला रामकृष्ण आस्वले (४५) असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पियोचा चालक नवशिक्या होता. वणी येथील एका लग्नाला ही मंडळी जात होती. गाडीचा वेग ही खूप जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहनाला ट्रकचा कट लागून हे वाहन रोड दुभाजकावर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वणी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


























































