शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूकीचा आज फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात होणार आहे, तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे होईल. निवडणूक आयोगाने त्याची कडेकोट तयारी केली असून नेरूळ येथील मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या चारही मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणात असलेल्या ५२ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार असून शिक्षक, पदवीधरांचे आमदार कोण ते उद्या ठरणार आहे.