
सामना ऑनलाईन, पनवेल
मुंबई कडुन पुण्याला जात असलेल्या एका खासगी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ८ जण जखमी झाले असून त्यातील ६ जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भातण बोगद्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत बस उलटली कशी हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. या बसमधून प्रवास करीत असलेले सगळेजण चेंबूर टिळक नगरमधील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. पावसाळी सहलीसाठी हे सगळेजण लोणावळ्याला जात असताना हा अपघात झाला आहे.

























































