
सामना ऑनलाईन । शिरुर
शिरुर येथील श्री महेश विद्यालयाच्या प्रांगणात क्रिकेट खेळत असताना बॅाल आणण्यासाठी छतावर गेलेल्या नववीच्या विद्यार्थ्याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. उमेर जब्बार शेख (१४) असं त्या मुलाचं नाव असून तो रविवारी सायंकाळी क्रिकेट खेळत होता. त्यावेळी बॅाल छतावर जाऊन पडला आणि तो आणण्यासाठी उमेर छाताला पायऱ्या नसतानाही कसरत करत छतावर गेला. त्या छतावरून वीजेची तार गेलेली असल्यामुळे त्याला शॉक लागला आणि तो जागीच ठार झाला. ही घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानी पंचनामा करून त्या मुलाचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.































































