पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, वाहतूक उशिराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या पाठोपाठ आता पश्चिम रेल्वे मार्गावर देखील तांत्रिक बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. आज दुपारी १२ च्या दरम्यान, अंधेरी ते विलेपार्ले रेल्वे स्थानकांदरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या विलंबामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.