
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या अजब वागण्यावर भाजपचे खासदार भडकले असून त्यांनी ही राहुल गांधींची नौटंकी असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या खासदार किरन खेर यांनी तर राहुल गांधीं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे देखील जाहीर केले आहे.
Rahul Gandhi should be ashamed, he can’t target our ministers without any proof. He was doing drama in the house and hugging Modi ji. I think his next step will be Bollywood. We will have to send him there: Kirron Kher, BJP MP#NoCofidenceMotion pic.twitter.com/nKN1ghaB0m
— ANI (@ANI) July 20, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जादू की झप्पी दिल्यानंतर राहुल गांधीवर भाजप खासदारांकडून टीका करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी ‘हे संसद असून मुन्नाभाईचा पप्पी-झप्पी एरिया नाही,’ असे म्हटले आहे. त्यानंतर संसदेबाहेर याबाबत खासदार किरन खेर यांना पत्रकारांनी राहुल गांधीच्या झप्पीबाबत विचारले असता त्यांनी राहुल यांच्यावर जोरदार टीका केली.
‘राहुल गांधी यांनी काहीही पुरावे नसताना आमच्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत. यासाठी त्यांना लाज वाटली पाहिजे. संसदेत मोदींना मिठी मारून ते नौटंकी करत होते. मला वाटतं ते लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. नाहितर आम्हाला त्यांना तेथे पाठवावं लागेल’, अशा शब्दात किरन खेर यांनी राहुल गांधींवर टीका केली.
























































