गोरेगावात खड्डय़ात पडून मुलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोरेगाव येथे मेट्रो रेल्वेसाठी खणलेल्या खड्डय़ात पडून तीनवर्षीय शीतल मिश्रा या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कंत्राटदाराला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही दंडाची रक्कम त्या मुलीच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.

गेल्या महिन्यात ही दुर्घटना घडली होती. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गादरम्यान ‘मेट्रो-७’चे काम सुरू आहे. त्यासाठी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलसमोर खोदकाम करण्यात आले आहे. कंत्राटदार जे. कुमार यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा ठपका एमएमआरडीएने ठेवला आहे.