व्हिडीओ : अन् माजी आरोग्यमंत्री सायकलवरून धडामकन पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं झालं असं गुरुवारी सकाळी तेज प्रताप यादव सुरक्षा जवानांसह शहरात सायकलचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. परंतु अचानक त्यांचे सायकलवरील नियंत्रन सुटते आणि ते धडामकन जमिनीवर आदळतात. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले राजदचे कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक त्यांना उठवतात. त्यानंतर ते पुन्हा एकदा आपली सायकल सवारी चालू करतात.