शिक्षकांने ३० सेकंदात विद्यार्थ्याच्या ११ वेळा कालशिलात लगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना ऑनलाईन । सूरत

पालक आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी लाखो रुपये खर्च करून महागड्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देतात. मात्र, शाळेतील शिक्षकांकडून मुलांना मारहाण केल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. सूरत मधील एका आठवीच्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्याबाबत शाळा प्रशासनाने कडक कारवाई करत शिक्षकाला निलंबीत केल आहे.

सूजल असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो लिटिल स्टार शाळेतील आठवीच्या वर्गात शिकत होता. तर, जीगर पटेल असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीमुसार, मारहाण झाल्याच्या दिवशी सूजल हा शाळेत त्याच्या मित्रांसोबत मस्ती करत होता, त्यात त्याने शाळेचा गृहपाठही केला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकाने त्याला मारहाण केली होती. राग अनावर झालेल्या जिगर पटेल यांनी फक्त ३० सेकंदाच्या कालावधीत सूजलला ११ वेळा कानाखाली लावल्या आणि लाथांनीही मारहाण केली. झालेल्या मारहाणीमुळे त्याचे पोटात दुखू लागले होते. जिगर पटेल हे याच वर्षाापसून शाळेत कार्यरत झाले होते. सूजलने त्याच्या कुटूंबीयांना झालेल्या मारहाणी विषयी सांगितले. सूजलच्या कुटूंबीयांनी शाळा प्रशासनाकडे त्याबाबतची तक्रार केली असता शाळा प्रशासनाने यावर कारवाई करत जीगर पटेल यांना निलंबीत केल आहे.